सिंधुदुर्ग: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीमधून एक अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कर्नाटक राज्यातील हंपी येथून आलेल्या एका ३८ वर्षीय पर्यटकाला धबधब्याखाली स्नान करत असताना विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना आंबोली घाटात झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका तब्बल अडीच तास अडकून पडल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने या पर्यटकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटन क्षेत्रातील प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील हंपी येथील काही पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोली येथील मुख्य धबधब्यावर आले होते. रविवारचा दिवस असल्यामुळे आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याचा आनंदात होते. दरम्यान, मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका अंधाऱ्या किंवा खाचखळग्यांच्या भागात स्नान करत असताना अचानक एका विषारी सापाने गंगाधर मरप्पा (वय ३८, रा. हंपी, कर्नाटक) या पर्यटकाला डावा केला.
साप चावल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती ढासळू लागली, त्यांची शुद्ध हरपली आणि त्यांच्या तोंडातून फेसाळ गळू लागला. ही गंभीर परिस्थिती पाहून त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तातडीने त्यांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशनावरील आवश्यक आणि पुढील उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी: वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णाला तातडीने रुग्णवाहिकेतून सावंतवाडीच्या दिशेने रवाना करण्यात आले. परंतु, वर्षा पर्यटनाच्या शेवटच्या वीकेंडमुळे आणि वीकेंडच्या तुफान गर्दीमुळे आंबोली घाट आणि मुख्य धबधबा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या भीषण वाहतूक कोंडीमध्ये रुग्णाची नेणारी रुग्णवाहिका तब्बल अडीच ते तीन तास रस्त्यातच अडकून पडली.
अनेक प्रयत्न करूनही आणि सायरन वाजवूनही वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळाला नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार किंवा विषविरोधी लस (Anti-snake venom) न मिळाल्यामुळे अखेर गंगाधर मरप्पा यांनी वाटेतच प्राण सोडले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि आपत्कालीन वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर रूपाने समोर आला आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- कोल्हापूर: आजऱ्यात बिबट्याचा थरार; मोर पकडण्यासाठी मारली तब्बल सात फूट उंच उडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



