28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते, मात्र विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्र पवार यांच्या नावाची घोषणा होताच, या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी हात उचावून सुनेत्रा पवार यांच्या निवडीला समर्थन दिलं. दरम्यान आता केवळ औपचारिकता बाकी असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्रिपदासह त्यांच्याकडे इतरही काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये पक्षाचा गट नेता म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली, तसेच राष्ट्रवादीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देखील त्यांना देण्यात आले. त्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे, येत्या 26 तारखेला यासंदर्भात घोषणा होणार आहे.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
- सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्या ट्रकला धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel


