अमरावती : दहा वर्षांपूर्वी एकदा किडनी प्रत्यारोपण झालेला रुग्ण पुन्हा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या छायेत उभा होता. नियमित डायलिसिसमुळे त्यांचे आयुष्य अत्यंत संघर्षमय झाले होते. अशा कठीण प्रसंगात, आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून एका ५५ वर्षीय सासूने मातृत्वाचा नवा आदर्श घालत स्वतःची एक किडनी दान केली आणि आपल्या जावयाला नवजीवन दिले.अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे शुक्रवार, ३१ जुलै रोजी ही ७५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
पुन्हा किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय:-
अचलपूर तालुक्यातील पारडी येथील रहिवासी देवानंद किसन चव्हाण (वय ४०) हे मागील काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांचे दहा वर्षांपूर्वी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण झाले होते; मात्र कालांतराने ती किडनी निकामी झाली.
त्यामुळे त्यांना जगण्यासाठी नियमित डायलिसिस करावे लागत होते. डायलिसिस करणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला.
सासूच्या त्यागाने वाचला मुलीचा संसार:-
यावेळी सर्वांत मोठा प्रश्न होता, तो म्हणजे योग्य किडनी दात्याचा (डोनर). जावयाची खालावलेली प्रकृती, पोटच्या मुलीचे भविष्य आणि तिचा सुखाचा संसार डोळ्यासमोर ठेवून सासू रंजना श्रीराम सोळंके (वय ५५) यांनी धाडसी पुढाकार घेतला.
त्यांनी स्वतःची एक किडनी देण्याचा खंबीर निर्णय घेतला. त्यांच्या या भावनिक निर्णयामुळे केवळ एका रुग्णाचे प्राण वाचले असून कुटुंबाला नव्याने उभारी मिळाली आहे.
दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करणे हे अत्यंत जोखमीचे आणि गुंतागुंतीचे होते. डॉक्टरांच्या चमूच्या प्रयत्नामुळे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यापूर्वी रुग्णाचे प्रत्यारोपण मुंबई येथे झाले होते; मात्र प्रत्यारोपित किडनीचे कार्य कमी झाल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. - डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर हॉस्पिटल.
शहर
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलचा कारनामा! पुण्यामध्ये पोलीस व्हॅनने अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
महाराष्ट्र
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
गुन्हा
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




