छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर आणि पैठणमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 'सुरक्षित अन्न-सुरक्षित महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत ऐतिहासिक कारवाई केली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरासह पैठण तालुक्यातील दोन मोठ्या ऑईल रिपॅकिंग कारखान्यांवर अचानक धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
कारवाईचा तपशील
अन्न व औषध प्रशासनाच्या जिल्हा पथकाने ११ जुलै रोजी पैठणमधील 'मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स' आणि छत्रपती संभाजीनगरमधील अभिनय टॉकीजच्या मागे असलेल्या 'मेसर्स बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि.' या दोन प्रतिष्ठानांवर छापे टाकले. तपासणीदरम्यान या कारखान्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली:
अस्वच्छता: कारखान्यातील यंत्रसामग्री, भिंती आणि फर्श्यावर धूळ, गंज आणि कोळीष्टके होती. तसेच रिफायनरी विभाग अत्यंत दुर्लक्षित होता.
तंत्रज्ञानाचा अभाव: तेलाचा दर्जा तपासण्यासाठी कोणतीही तांत्रिक प्रयोगशाळा किंवा तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त केलेली नव्हती.
नियमबाह्य प्रक्रिया: रिफाइंड पाम, सोयाबीन, कपाशी आणि वनस्पती तेलाचे रिपॅकिंग करताना वापरलेल्या डब्यांचा (tins) पुनर्वापर होत होता. तसेच आवश्यक विश्लेषण अहवाल आणि फूड ग्रेड प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती.
मोठा धोका:
एकाच परिसरात रिफायनरी आणि पॅकिंग विभाग असल्याने 'क्रॉस-कंटॅमिनेशन'चा मोठा धोका होता. केवळ नफा कमावण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास तडजोड केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




