भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा कायम राखत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 या मोहिमेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. इशान किशन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 175 धावा केल्या. इशानने 77 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादव याने 32, शिवम दुबे 27 आणि तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तानला 114 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? सूर्या काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
सूर्या टीम इंडियाच्या कामगिरीमुळे आनंदी
“हे भारतासाठी आहे. या खेळपट्टीवर पहिले बॅटिंग करणं हा सर्वोत्तम पर्याय होता. पहिल्या डावात बॅटिंग करताना विजयासाठी किती आव्हान द्यायचं सागणं अवघंड होतं. मात्र स्कोअरबोर्डवर 175 धावा लागल्यानंतर आम्ही 15-20 धावा जास्त केल्यात असं आम्हाला वाटलं. मात्र 155 धावा केल्या असत्या तर सामना अटीतटीचा झाला असता”, असं सूर्याने नमूद केलं.
सूर्याने विजयानंतर बोलताना आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. ते तसेच खेळले जसं अपेक्षित होतं, असं सूर्याने सांगितलं.
“आम्ही तसंच खेळलो जसं आम्हाला अपेक्षित होतं. इशान किशन यानेही त्याच प्रकारे बॅटिंग केली (ज्याप्रकारे इशानने गेल्या काही सामन्यांत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केली). 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर कुणाला तरी जबाबदारी घ्यायची होती. इशानने जबाबदारी घेऊन चांगली कामगिरी केली”, असं म्हणत सूर्याने इशानच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.
सूर्याने इशान व्यतिरिक्त टीम इंडियाच्या तिघांचं नाव घेतलं. सूर्याने तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या तिघांच्या बॅटिंगचं कौतुक केलं. “ज्या पद्धतीने त्यांनी (तिलक, शिवम आणि रिंकु) बॅटिंग केली ते कौतुकास पात्र आहेत”, असं कर्णधार म्हणाला.
गोलंदाजांचाही उल्लेख
सूर्या फलंदाजांचं कौतुक करताना गोलंदाजांचं योगदान विसरला नाही. सूर्याने गोलंदाजांचा उल्लेख करत त्यांनाही श्रेय दिलं. “हार्दिक पंड्या याने नव्या चेंडूने धमाका केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह यानेही तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज का आहे दे दाखवून दिलं. विजयात सर्वांनी दिलेलं योगदान पाहून फार चांगलं वाटलं”, असं म्हणत सूर्याने संघाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील कारागृह प्रशासनाचा कणाच खिळखिळा; १२ वर्षांपासून 'तुरुंगाधिकारी श्रेणी-२'ची भरती ठप्प, ७० टक्के पदे रिक्त!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'


























Subscribe to my channel


