एआयच्या सुरक्षाविषयक आणि लष्करी धोक्यांबाबतबरीच चर्चा झाली आहे. मोजक्या भाषांवर प्रशिक्षितआणि काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकीच्या लार्जलँग्वेज मॉडेल्समुळे (एलएलएम) निर्माण होणाऱ्यासांस्कृतिक आणि आर्थिक धोक्यांकडे तुलनेने कमीलक्ष दिले गेले. या एलएलएमचे बाजारातील वर्चस्वदुय्यम भाषांचा वापर करणाऱ्या विकसनशील देशांसाठीतोट्याचे ठरत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ओपनएआयने चॅटजीपीटी सादरकेल्यापासून उद्योगक्षेत्रातील नेते आणि धोरणकर्तेएआयमुळे उत्पादकता वाढण्याच्या क्षमतेचे कौतुक करत आहेत. मात्र त्याचे लाभ सर्वांपर्यंत समान प्रमाणातपोहोचत नाहीत. भाषाविषयक पूर्वग्रहांमुळे अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांना या एआय प्रणालींचापुरेसा लाभ मिळत नाही. जगात बोलल्या जाणाऱ्या 7 हजारांहून अधिक भाषांपैकी बहुतांश एलएलएमनाकेवळ सुमारे 100 भाषांवर प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी वापरला जाणारा बहुतांश डेटा इंग्रजी, चिनी, स्पॅनिश,फ्रेंच आणि जर्मन या भाषांमधूनच घेतला जातो.प्रत्यक्षात जगात केवळ 40 कोटी लोकांची मातृभाषाइंग्रजी आहे तर जागतिक लोकसंख्येपैकी फक्त 25टक्के लोकांची पहिली भाषा या ‘बिग फाइव्ह'' भाषांपैकीएक आहे. अल्पावधीत हा असमतोल सांस्कृतिकआणि आर्थिक दरी वाढवू शकतो तर दीर्घकाळातअनेक देशांच्या विकासाला अडथळा निर्माण करूनभाषिक वैविध्यालाही धोका निर्माण करू शकतो.आणखी एक विरोधाभास म्हणजे श्रीमंत देशांनीएआयचा वेगाने स्वीकार केल्यामुळे विकसनशीलदेशांतील वापरकर्त्यांसाठी इंटरनेट आणि डिजिटलसाधनांचा लाभ घेणे अधिक कठीण झाले आहे.एलएलएममध्ये स्थानिक भाषा आणि संस्कृतीचेअधिक अचूक प्रतिबिंब असणे आवश्यक आहे.अन्यथा अनेक समुदायांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्णशब्दसंपदेचा वारसा गमावण्याचा धोका निर्माण होईल.ही शब्दसंपदा ऐतिहासिक घटना, मोठ्या प्रमाणातीलस्थलांतर आणि राजकीय वारशातून घडलेली आहे.एआय प्रणालींमध्ये भाषिक वैविध्याचा अभावराहिल्यास त्याचा स्वीकारही संथ होईल. उदाहरणार्थ,पेरूमध्ये डिजिटल वित्तीय सेवांना ग्राहकांशी स्थानिकबोलीभाषेत संवाद साधावा लागेल. व्हिएतनाममध्येऑनलाइन आरोग्यसेवा प्रभावी ठरण्यासाठी स्थानिकभाषेतील अचूकता आवश्यक आहे आणि ती केवळस्थानिक भाषा मॉडेलद्वारेच मिळू शकते. मोबाइलनेटवर्क ऑपरेटर्स (एमएनओ) यांच्याकडे मोठ्याप्रमाणावर विकासक आणि डेटा प्रक्रिया क्षमताअसल्याने स्थानिक भाषा मॉडेल तयार करण्याचीअनोखी संधी आहे. ते परवानाधारक आणि सरकारचेविश्वासार्ह भागीदारही आहेत. अशा उपेक्षित असलेल्याभाषांसाठी एलएलएम तयार करताना प्रशिक्षणासाठीआवश्यक डेटाची कमतरता हा मोठा अडथळा आहे.यावर उपाय म्हणून सरकारांकडे उपलब्ध असलेलामोठ्या प्रमाणातील, मात्र संवेदनशील आणि गोपनीयडेटा उपयोगी ठरू शकतो. उदाहरणार्थ, युक्रेनमधीलसर्वात मोठ्या मोबाइल नेटवर्क ऑपरेटर कीव्हस्टारनेडिजिटल परिवर्तन मंत्रालयाच्या सहकार्याने देशातीलपहिले राष्ट्रीय एलएलएम विकसित केले. हे मॉडेलयुक्रेनियनबरोबरच रशियन, बल्गेरियन आणि क्रिमियनतातार या भाषांसाठीही अनुकूल करण्यात आले आहे. ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्सअसोसिएशनचा (जीएसएमए) — मी महासंचालकआहे — आफ्रिकन एआय भाषा मॉडेल प्रकल्पाद्वारेनायजेरिया, मादागास्कर, टोगो आणि काँगोप्रजासत्ताकसह उप-सहारा आफ्रिकेतील अनेकदेशांमध्ये अशाच प्रकारची रणनीती राबवत आहे. याउपक्रमात एअरटेल, अॅक्सियन टेलिकॉम, एथिओटेलिकॉम, एमटीएन, ऑरेंज, व्होडाकॉमसह इतरदूरसंचार कंपन्या, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातीलतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरी समाज संघटनाआफ्रिकन भाषांसाठी एलएलएम विकसित करण्यासाठीएकत्र आल्या आहेत. एआयच्या वापराकडे व्यापकदृष्टीने पाहण्याची गरज आहे. (प्रोजेक्ट सिंडिकेट) जग आता एजेंटिक एआयच्या दिशेनेवाटचाल करत आहे. बँकिंग, आरोग्यसेवाव शिक्षणाशी संबंधित डिजिटल सेवांतवापरकर्त्यांच्या मदतीसाठी एआयचावेगाने स्वीकार होत आहे. अशा स्थितीतभाषेच्या मर्यादेमुळे एखादा देश यापरिवर्तनात मागे राहणे,हे चुकीचे ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




