पंढरपूर:"विठूरायाला आपलं सगळं मागणं माहीत असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे," असे मनःपूर्वक साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शासकीय महापूजा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे ३ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास पारंपरिक विधीनुसार शासकीय महापूजा संपन्न झाली. या पवित्र पूजेदरम्यान सर्वप्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आणलेला पारंपरिक व खास पोशाख विठूरायाला मोठ्या श्रद्धाभावाने परिधान करण्यात आला. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा करण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील माने दांपत्याला (मानाचे वारकरी) मिळाला होता.
पंढरपुरात भक्तीचा महासागर आणि विशाळ गर्दी:
विठ्ठलाच्या दर्शनाची आस बाळगून राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे सध्या संपूर्ण पंढरपूर नगरीत भक्तीचा महासागर उसळला आहे. वारकऱ्यांनी पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी अलोट गर्दी केली आहे. सध्या पंढरपुरात २० लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आणि पत्रावरील दर्शनासाठी लागलेली दर्शनरांग तब्बल ५ किलोमीटरच्या पुढे गेली असून, भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी सुमारे १८ ते २० तासांचा अवधी लागत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासकीय तयारी:
लाखो भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत उभ्या असलेल्या थकलेल्या आणि लांबपर्यंत रांगेत असलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी, चहा आणि खिचडीचे वाटप सातत्याने केले जात आहे. प्रशासनाने 'वारकरी हाच खरा व्हीआयपी' मानून अनेक वयोवृद्ध वारकऱ्यांना थेट दर्शन घडवण्याबाबत विशेष खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले.
या पवित्र महापूजा सो्सारानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणे हे माझ्यासाठी आणि समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठे सौभाग्य आहे. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी संपूर्ण राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. "हे पांडुरंगा, राज्यातील सर्व घटकांना सुखी ठेव, शेतकरी राजाला कधीही दुःखी करू नकोस, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम पाऊस पडू दे आणि सर्वांच्या आयुष्यात भरभराट व आनंद नांदो," अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शहर
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- भोसलेकालीन ऐतिहासिक 'बारव' मोजतेय शेवटच्या घटका; खचलेले कठडे, कचरा अन् शेवाळाच्या साम्राज्यामुळे नागपूरचा प्राचीन वारसा धोक्यात
- छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महाग, अपहरण करून विवाहितेवर २४ तास अत्याचार;
महाराष्ट्र
- सातारा: वाठार निंबाळकरजवळ भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू तर अन्य तिघे गंभीर जखमी
- महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून जेरबंद; महिनाभरानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई"
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
गुन्हा
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
























Subscribe to my channel



