रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. बॉलिवूडमधील उल्लेखनीय चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे. या चित्रपटाच्या यशावर अनेक सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा चित्रपट दमदार वाटला, तर काहींनी त्यात हिंसक दृश्यांचा भरणा असल्याचं म्हटलंय. आता अभिनेता अभिषेक बच्चनने या चित्रपटावर मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी आहे. आपले आकडे इतके मोठे आहेत की, अरे आपण आपला स्क्विड गेम कधी तयार बनवणार असा विचार करणंच चुकीचं ठरेल. आपण धुरंधर बनवला आहे आणि त्याच्या कमाईच्या आकड्यांकडे एकदा पहा”, असं तो म्हणाला.
“धुरंधरच्या तिकिटांच्या विक्रीचा आकडाच पहा. हा कोणत्याही चित्रपटाला किंवा शोला सहज मागे टाकेल. त्यामुळे हा आकड्यांचा विषय आहे. कोरियन ड्रामा आणि चित्रपटांविषयी इतकं बोललं जातं, पण त्यांची व्ह्युअरशिप काय आहे, त्यांचे आकडे काय आहेत? भारतीय ज्या संख्येने चित्रपट पहायला जातात, त्या तुलनेत ते सर्व फिकं पडेल. त्यामुळे आपल्याकडे आकडे आधीपासूनच आहेत. त्यामुळे फॅड बनण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे आकडे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात? मला वाटत नाही की आपण फॅड बनू इच्छितो”, असं तो पुढे म्हणाला.
याआधी आमिर खानने ‘धुरंधर’च्या आकड्यांबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिली होती. जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं होतं. “या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्हीच विचार करा, जर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सऐवजी 15000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असला, तर काय झालं असतं? कमाईचा आकडा आणखी जास्त असता. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा स्क्रीन्सची संख्या वाढेल. कारण आपल्या देशात असे बरेच जिल्हे आहेत, जिथे सिंगल स्क्रीनसुद्धा नाही”, असं तो म्हणाला होता.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीरसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




