छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घृणास्पद कृत्याने संपूर्ण खाकी वर्दीची मान शरमेने झुकली आहे. एका ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेवर अत्याचार करून तिला धमकावल्याप्रकरणी ५३ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे.

नेमका प्रकार काय?
पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हरीश खटावकर याची पीडितेशी चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन मे २०१५ मध्ये त्याने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये 'घराच्या इंटिरिअर डिझाईनचे काम पाहायचे आहे' असे सांगून त्याने पीडितेला स्वतःच्या घरी बोलावले आणि तिथेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर बदनामीची भीती दाखवून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता.

 

कारमध्ये अमानुष मारहाण:
१५ जुलै २०२६ रोजी या छळाचा कळस झाला. या प्रकरणामुळे पीडितेचा पतीशी वाद होऊन तिला घराबाहेर काढण्यात आले. याच संधीचा फायदा घेत खटावकर तिथे पोहोचला आणि त्याने पीडितेला बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये कोंडले. चालत्या कारमध्ये त्याने तिला बेदम मारहाण केली आणि रात्री १० वाजेच्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून तिला रस्त्यावर सोडून पळ काढला.

आरोपीचा वादग्रस्त इतिहास:
आरोपी हरीश खटावकर याचा इतिहास आधीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. ११ वर्षांपूर्वी एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याला खात्यातून निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या गंभीर गुन्ह्यामुळे पोलीस उपायुक्त कार्यालयाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे त्याच्यावर कठोर कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *