आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडवर मात केली. इंग्लंडने अशाप्रकारे आपल्या मोहिमेतील सलग दुसरा विजय मिळवत आव्हान कायम ठेवलं. स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने खेळवयात आले आहेत. मात्र त्यानंतर अजूनही सुपर 8 मध्ये एकाही संघाचा प्रवेश निश्चित झालेला नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील 24 वा सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये धडक देईल. एका बाजूला आता सुपर 8 साठी चुरस पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला चाहत्यांची भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील तिसरा सामना असणार आहे. भारत आणि पाकिस्तानने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे रविवारी होणारा सामना जिंकून कोणता संघ थेट सुपर 8 मध्ये धडक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने जबरदस्त कामगिरी केलीय. तर पाकिस्तानही ठिकठाक कामगिरी करत इथवर पोहचलाय. सलमान अली आगा याने त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानला अजिंक्य ठेवलंय. त्यामुळे हायव्होल्टेज सामन्यात चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 खेळाडूंसाठी खास ठरणार आहे.
प्रत्येक खेळाडूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असतं. त्यानंतर कारकीर्दीत एकदातरी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी हे खेळाडूचं ध्येय असतं. काही खेळाडूंची ध्येयपूर्ती होते तर काहींची नाही. हीच बाब भारत-पाकिस्तान सामन्याबाबतही लागू पडते. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात खेळाडूंना चमकदार कामगिरी करुन क्रिकेट विश्वात आपली छाप सोडण्याची संधी असते.
आता रविवार 15 फेब्रुवारी हा दिवस दोन्ही संघांच्या एकूण 15 खेळाडूंसाठी अविस्मरणीय असा ठरणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांतील 15 खेळाडूंना संधी मिळाल्यास त्यांचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील एकमेकांविरूद्धचा पहिलाच सामना ठरणार आहे.
टीम इंडियाचे किती खेळाडू?
टीम इंडियाकडून आतापर्यंत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन आणि कुलदीप यादव हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळले आहेत. मात्र ते टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळले नाहीत. त्यामुळे या खेळाडूंना संधी मिळाल्यास रविवारी त्यांचं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पदार्पण होईल.
तसेच पाकिस्तानकडून उस्मान तारिक, सलमान मिर्जा, अब्रार अहमद, कर्णधार सलमान अली आगा, फहीम अश्रफ, ख्वाजा नफे, साहिबजादा फरहान आणि सॅम अय्यूब हे टीम इंडिया विरुद्ध टी 20I वर्ल्ड स्पर्धेत खेळले नाहीत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- केजरीवाल-सिसोदिया यांना दिलासा, ‘आप’ला राजकीय बळ; काँग्रेसला आगामी निवडणुकांची चिंता
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


