नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!

नवी दिल्ली: काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम असून, आजही बाजारात सोन्याच्या भावात घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे ०.८६ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,९०० रुपये इतका नोंदवला गेला आहे.

मागील व्यवहाराच्या तुलनेत हा दर कमी झाला असून, बाजारातील अस्थिरतेमुळे भावात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्याही दरात घसरण झाली असून, आज तो प्रति १० ग्रॅम १,३०,९९० रुपये इतका आहे.

 

महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण ग्राहकांसाठी काहीशी दिलासादायक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी दरांची खात्री करूनच व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *