मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

मुंबई: शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर आता विविध संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल ताप, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया आणि इन्फ्लूएंझासदृश आजारांच्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी (co-morbid) असलेल्या रुग्णांना या आजारांचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

आजारांची लक्षणे:
या काळात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी आणि उलट्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही रुग्णांमध्ये तापासोबतच तीव्र थकवा आणि स्नायू दुखणे अशी मिश्र लक्षणे दिसून येत आहेत. फिजिशियन डॉ. एन. एम. मोरे यांच्या मते, गेल्या दोन आठवड्यांत २२ ते ५५ वयोगटातील रुग्णांमध्ये व्हायरल संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.

 

काय काळजी घ्यावी?
आजारांचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांनी खालील खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे:

वैयक्तिक स्वच्छता राखा आणि वारंवार हात धुवा.

सर्दी-खोकल्याची लक्षणे असल्यास गर्दीची ठिकाणे टाळा.

नियमित अंतराने भरपूर पाणी प्या.

नेहमी ताजे आणि गरम अन्न सेवन करा.

लहान मुलांच्या बाबतीत लसीकरण पूर्ण असल्याची खात्री करा.

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका:
जर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या:
१. ताप दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे.
२. श्वास घेण्यास त्रास होणे.
३. घशात तीव्र खवखव आणि सतत खोकला येणे.
४. तीव्र अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवणे.
५. डेंग्यूची लक्षणे (उदा. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना) दिसणे.
६. जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होणे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *