सातारा: तुकाराम मुंढे यांच्या धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतले

सातारा: जिल्ह्यातील माण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची धाड पडणार, या भीतीने दूध विक्रेत्यांनी आणि संकलकांनी शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?अन्न भेसळीच्या विरोधात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कडक कारवाई केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांच्या विभागातर्फे धाडी सत्र सुरू आहे. माण तालुक्यात अचानक ही कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच, दूध केंद्रांवर आणि संकलन केंद्रांवर खळबळ उडाली. प्रशासनाच्या धाडीच्या भीतीने काहींनी धावपळ सुरू केली आणि पकडले जाण्याच्या भीतीपोटी आपल्याकडील साठवलेले शेकडो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले.

 

चर्चेला उधाण: एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध रस्त्यावर ओतून दिल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दूध इतक्या घाईने का ओतले गेले? त्यात मोठी भेसळ होती का? किंवा नियमांचे उल्लंघन होत होते का? अशा अनेक शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. 'तुकाराम मुंढे आले' या केवळ एका नावाच्या भीतीमुळे दूध व्यावसायिकांची झालेली ही धावपळ प्रशासनाच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची प्रचिती देत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *