मुंबई: राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये (१५०० + १५००) थेट महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नेमकी परिस्थिती? 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिना उजाडला असला तरी अनेक महिलांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणी आणि पात्रतेच्या पडताळणीमुळे काही कालावधीसाठी ही प्रक्रिया संथ झाली होती.
८० लाख महिलांना फटका: या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे, बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसणे आणि पात्रतेच्या निकषांमध्ये तांत्रिक त्रुटी असणे अशा विविध कारणांमुळे राज्यातील सुमारे ८० लाख महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता. यामुळे अनेक पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते.
३००० रुपये कधी मिळणार? सध्याच्या माहितीनुसार, शासन रखडलेले हप्ते लवकरच वितरित करण्याच्या तयारीत आहे. १२ जुलै ते १५ जुलै दरम्यान जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्रितपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात, अशी चर्चा जोर धरत आहे. जरी यावर सरकारकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असले, तरी महिलांचे लक्ष आता या तारखांकडे लागले आहे.
लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, हे पुन्हा एकदा तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहर
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
महाराष्ट्र
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला




























Subscribe to my channel


