पुणे: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

पुणे: 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janata Party - CJP) यांच्या प्रस्तावित आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी
नाकारली आहे. परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉकरोच जनता पार्टी'कडून विविध शैक्षणिक प्रश्न, विशेषतः नीट (NEET) परीक्षा आणि कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली.

पोलिस प्रशासनाने आयोजकांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी आंदोलन, मोर्चा किंवा जमाव जमविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलनाचे आयोजक आपली भूमिका कायम असल्याचे सांगत असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.दुसरीकडे, पोलिसांनी सर्व आंदोलने आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे.

या निर्णयानंतर शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात आयोजक काय भूमिका घेतात आणि पोलिस प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *