तमिळनाडू: राजकारणात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळगम (TVK)सरकार अस्थिर करण्यासाठी पक्षाच्या एका आमदाराला तब्बल ३५ कोटीरुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करततिघांना अटक केली असून संपूर्ण राज्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
ही घटना उथंगराई मतदारसंघाचे TVK आमदार एन. इलैयाराजा यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. त्यांच्या तक्रारीनुसार, थिरुनावुक्कारासू नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला 'इंडियन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक स्ट्रॅटेजीज (IPDS)' या संस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले. त्याने एका मोठ्या राजकीय पक्षाच्या वतीने बोलत असल्याचा दावा करत विधानसभा अध्यक्षांविरोधातील प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आमदार इलैयाराजा यांनी ही ऑफर तात्काळ नाकारल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा संपर्क साधू नये, असे स्पष्ट करूनही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. यानंतर त्यांनी चेन्नई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिघांना अटक केली. तपासादरम्यान काही आरोपींचे कथित संबंध माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि त्यांचे भाऊ व्ही .अशोक कुमार यांच्याशी असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मात्र या आरोपांची चौकशी सुरू असून अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकार अस्थिर करण्याच्या उद्देशाने केवळ एका नव्हे तर सत्ताधारी TVK पक्षाच्या सुमारे १५ आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले असून तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून TVK आणि DMK यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी पक्षाने सरकार पाडण्यासाठी आमदार फोडण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे,तर विरोधी पक्षाने हे आरोप फेटाळत प्रत्यारोप केले आहेत. या प्रकरणामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


