महाराष्ट्र: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) आणखी एक महत्त्वाची कारवाई करत मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या फरार आरोपी बिजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारमधील पाटणा येथून अटक केली आहे. या अटकेमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान सुमन कुमारी हिची भूमिका आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपींना आर्थिक मदत पुरविणे तसेच काही व्यवहारांमध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय आहे. अटकेनंतर तिलापुढील चौकशीसाठी महाराष्ट्रात आणून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. त्याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिजेंद्र गुप्ता हा अनेक बनावट नावांचा वापर करत विविध राज्यांतील परीक्षा पेपरफुटी प्रकरणांमध्ये सक्रिय असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि ओडिशामधील काही परीक्षा घोटाळ्यांशी त्याचे संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
टीईटी परीक्षा होण्याच्या काही दिवसांपूर्वी आरोपींनी संभाव्य खरेदीदारांचा शोध घेतल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत काही आरोपींना प्रश्नपत्रिका विक्रीच्या प्रयत्नादरम्यान अटक केली होती. त्यानंतर
तपासाचा विस्तार करण्यात आला आणि संपूर्ण आंतरराज्यीय रॅकेट उघड करण्यासाठी SIT कार्यरत आहे.
दरम्यान, पेपरफुटी उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्य सरकारने उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले असून नव्या तारखेची घोषणा स्वतंत्रपणे केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
शहर
- बाल गुन्हेगारांवर सरकारचा मोठा निर्णय; वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार!
- एकाच कुटुंबाला अनेक फेरीवाला परवाने? मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; धोरण फेरपडताळणीचे आदेश!
- मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न जिवावर बेतला! जेवणाच्या ताटावरून उठून धावलेल्या १३ वर्षीय शाहूचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत!
- पोटगी म्हणजे खंडणी नव्हे, पण कायद्याचा गैरवापर खपवून घेणार नाही'; मुंबई उच्च न्यायालयाची ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना चपराक!
महाराष्ट्र
- बाल गुन्हेगारांवर सरकारचा मोठा निर्णय; वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार!
- एकाच कुटुंबाला अनेक फेरीवाला परवाने? मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; धोरण फेरपडताळणीचे आदेश!
- मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न जिवावर बेतला! जेवणाच्या ताटावरून उठून धावलेल्या १३ वर्षीय शाहूचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत!
- पोटगी म्हणजे खंडणी नव्हे, पण कायद्याचा गैरवापर खपवून घेणार नाही'; मुंबई उच्च न्यायालयाची ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना चपराक!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.

























Subscribe to my channel



