माहितीच्या अधिकारावरील गदा : महाराष्ट्र माहिती आयोगाच्या नव्या नियमांतील नियम २०(३) बाबत गंभीर आक्षेप
पुणे- महाराष्ट्र शासनाने माहिती आयोगाच्या कामकाजासाठी अधिसूचित केलेल्या नव्या नियमांमधील नियम २०(३) अत्यंत चिंताजनक असून, त्याद्वारे अपीलकर्ता किंवा तक्रारदार यांना सुनावणीदरम्यान मदत करणारी व्यक्ती "विधी व्यवसायी (वकील) असणार नाही" अशी अट घालण्यात आली आहे. असे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी म्हटले आहे. या गंभीर विषयावर आपण ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. पवार यांनी म्हटले की, नियम २०(३) मधील ही तरतूद केवळ वकिलांच्या व्यावसायिक अधिकारांवर गदा आणणारी नाही, तर सामान्य नागरिकांच्या न्यायप्रवेशाच्या अधिकारावरही मर्यादा आणणारी आहे. माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकांना प्रशासनास जबाबदार धरण्याचे प्रभावी साधन आहे. अनेक वेळा माहिती आयोगासमोर कायदेशीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होत असतात.अशा परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलामार्फत किंवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे मांडणी करण्याचा अधिकार नाकारणे हे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळविण्याचा आणि स्वतःचे म्हणणे प्रभावीपणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. मग माहिती आयोगासमोरील अपील किंवा तक्रारीमध्ये नागरिकांना वकिलांची मदत घेण्यास प्रतिबंध का? असा सवाल ॲड. पवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने या नियमामागील भूमिका स्पष्ट करावी. माहितीचा अधिकार अधिक सक्षम करण्याऐवजी, नागरिकांच्या हातातील कायदेशीर साधने कमी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मागणी अशी आहे की, नियम २०(३) तात्काळ मागे घेण्यात यावा किंवा त्यामध्ये सुधारणा करून नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलामार्फत अथवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे माहिती आयोगासमोर हजर राहण्याचा अधिकार अबाधित ठेवावा.
माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा कणा आहे. या अधिकाराच्या अंमलबजावणीवर कोणत्याही प्रकारची मर्यादा आणण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल, असेही ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी स्पष्ट केले.
शहर
- आंबा घाटात मोठा अनर्थ टळला; कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग, चालकाने वेळीच उडी मारल्याने वाचले प्राण!
- काळ आला होता पण वेळ नाही! आंबेनळी घाटात २०० फूट खोल दरीत कोसळलेला तरुण सुखरूप बाहेर; रेस्क्यू टीमचे मध्यरात्री थरारक बचावकार्य
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
- बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
महाराष्ट्र
- आंबा घाटात मोठा अनर्थ टळला; कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग, चालकाने वेळीच उडी मारल्याने वाचले प्राण!
- काळ आला होता पण वेळ नाही! आंबेनळी घाटात २०० फूट खोल दरीत कोसळलेला तरुण सुखरूप बाहेर; रेस्क्यू टीमचे मध्यरात्री थरारक बचावकार्य
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
- बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
गुन्हा
- बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
- बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठींच्या कुटुंबावर मोठा संकट! मोठ्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; प्रकृती अत्यंत चिंताजनक
- नवी मुंबई: उलवे देहव्यापार प्रकरण: दोन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप; शिवसेना-भाजपचे नगरसेवक अटकेत!
- उत्तर प्रदेशात पोलिसांचा पुन्हा 'हाफ एनकाउंटर'! पळून जाण्याच्या प्रयत्नात मुख्य आरोपीच्या पायावर झाडली गोळी, रुग्णालयात दाखल
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कडक सुरक्षा आणि अवघड प्रश्नपत्रिकेचे आव्हान; लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती!
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित























Subscribe to my channel




