रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूबद्दल आईचा मोठा खुलासा
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदम (Patmesh Kadam) आणि त्याची आई ही मायलेकांची जोडी सोशल मीडियावर एकदम फेमस होती. प्रथमेश हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, रील स्टार तसेच डान्सरही होता. आईसोबतचे त्याचे व्हिडीओ खूप गाजायचे. मात्र याच प्रथमेशचं गेल्या महिन्यात म्हजेच 26 जानेवारी रोजी दु:खद निधन झालं. तो बराच काळ आजारी होता, अखेर 26 जानेवारी रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली होती. मात्र त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. प्रथमेशचं अचानक जाणं कोणीच पचवून शकलं नाही. त्याच्या कुटुंबावर, आई-बहिणीवर तर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.
मात्र प्रथमेशच्या जाण्यानंतर त्याच्या निधनाबद्दल वेगवेगळी चर्चा होऊ लगाली, अनेक तर्क-वितर्क व्यक्त होऊ लागले. त्याचा मृत्यू कसा झाला, त्याला काय झालं होतं, त्याने आत्महत्या केली का असे अनेक प्रश्न लोकांकाडून उपस्थित होऊ लागले. त्याच्या आईला-बहिणीला मेसेज करून याबद्दल अनेकांनी विचारलं. सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. मात्र आता त्याच्या आईने, प्रतीक्षा कदम यांनी प्रथमेशच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच भाष्य करत त्याच्या निधनाचं खरं कराण सर्वांना सांगितलं आहे. त्यांनी मौन सोडत आपल्या मुलाला नेमकं काय झालं ते नमूद केलं आणि सोशल मीडिया यूजर्सना रडत-रडत एक विनंती देखील केली.
प्रथमेश कदमने आत्महत्या केली ? आईने अखेर सोडलं मौन
प्रथमेश कदमच्या आईने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीो शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूबद्दल सांगितलं आहे. आपल्या मुलाच्या जाण्याने शोकविव्हल झालेल्या त्या आईने खूप धीर करत सर्व सत्य लोकांसमोर मांडायचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या व्हिडीओत संपूर्ण घटना कथन केली आहे. ” नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी. गेल्या काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूपच त्रास होत होता, म्हणजे असे व्हिडीओ येत होते, असं बोललं जातं होतं की, की प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. पण त्याला असं काहीही झालं नव्हतं, असं त्याच्या आईन स्पष्ट केलं. त्याचं (मृत्यूचं) खरं कारण एकच, ते म्हणजे ब्लडमध्ये कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते, ती कोणालाही कळत नाही. उपचारांसाठी मी जेव्हा त्याला ॲडमिट केलं, तेव्हा डॉक्टरांनी मला गॅरेंटी दिली होती. तेव्हा डॉक्टर म्हणाले, की तो दोन-तीन दिवसांत कव्हर होऊन जाईल, रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत, पण त्याच कावीळीने माझ्या मुलाचा घात केला ” हे सांगताना प्रथमेशच्या आईचा तेहरा वेदनेने पिळवटून गेला होता.
हात जोडून विनंती करते, अफवा पसरवू नका
पुढे त्यांनी याबद्दल आणखी सविस्तर माहिती दिली. ” पण डॉक्टरांनाही कळलं नाही , शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळलं की, त्याच्या रक्तामध्ये व्हाइट कावीळ मिसळली. त्याच्या पूर्ण शरीरात रक्ताची कावीळ मिसळली होती, अखेर तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. डॉक्टरांचे ते बोल ऐकून मी खचून गेले की, मला वाटलं आता माझ्या मुलाची काही गॅरेंटी नाही. ती कावीळ रक्तात मिसळली की माणूस शेवटी संपतो आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशने या जगाचा निरोप घेतला. या सगळ्याचा खूप त्रास झाला मला” असं त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी सर्वांना एकच विनंती केली. ” मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणीही काहीही बोलेल त्याकड लक्ष देऊ नका. आणि काय झालं, कसं झालं हे मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून विचारू नका. गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडीओ केला”. असं त्यांनी व्हिडीओमध्ये अखेरीस नमूद केलं. अश्रूंनी गदगदलेल्या स्वरात त्यांनी संपूर्ण व्हिडीओ केला.
त्यांच्या या व्हिडीओवर अनेक लोकांना कमेंट्स करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काकू आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगत अनेकांनी प्रथमेशच्या आईचं सांत्वन केलं. वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आईलाही धीर दिला होता. आईसोबत मिळून तो सोशल मीडियावर रील पोस्ट करू लागला होता आणि त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी सोशल मीडियावर अनेकांना आवडत होती. आधी पतीचं निधन आणि आता तरणाताठा मुलगा गेल्याने त्याची आई प्रचंड शोकाकुल आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




