Marathi classes for non-Marathi drivers disrupted at Thane RTO office; MNS demands priority for Marathi youths!

मुंबई: ठाणे आरटीओ कार्यालयात अमराठी चालकांचे मराठी वर्ग उधळले; मराठी तरुणांना प्राधान्य देण्याची मागणी!

Marathi classes for non-Marathi drivers disrupted at Thane RTO office; MNS demands priority for Marathi youths!मुंबई: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या चालकांना मराठी येणार नाही, त्यांच्यावर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. अमराठी चालकांना जुजबी मराठी बोलता यावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे
आरटीओ कार्यालयात मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले होते.

मात्र, बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे वर्ग उधळून लावले. मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनसैनिकांनी तेथील अमराठी उमेदवारांना हुसकावून लावले. "परप्रांतीय उमेदवारांना काय शिकवता? आधी आपल्या मराठी तरुणांना प्राधान्य द्या,"
अशी मागणी करत मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

 

मनसेचा आरोप:
मनसेने या वेळी परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांच्या वाढत्या मुजोरीचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि काही घटनांचा संदर्भ देत, परप्रांतियांना प्रोत्साहन न देता मराठी तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याची आग्रही मागणी रवींद्र मोरे यांनी केली. या आंदोलनादरम्यान पुष्करराज विचारे,
संदीप साळुंखे आणि प्रशांत पालांडे हे पदाधिकारीही उपस्थित होते.



शहर

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *