अमेरिका: अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटात असलेल्या प्रसिद्ध 'एडवर्ड्स एअर फोर्स बेस'वर सोमवारी (१५ जून) एक अत्यंत भीषण अपघात घडला. अमेरिकन वायू दलाचे अत्यंत शक्तिशाली आणि महाकाय मानले जाणारे 'B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस' बॉम्बर विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच कोसळले. या अपघातात विमानातील सर्व ८ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सोमवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास 'रूटीन टेस्ट मिशन'साठी उड्डाण करत होते. मात्र, एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच ते रनवेच्या जवळ असलेल्या वाळवंटी भागात कोसळले. विमान जमिनीवर आदळताच त्यामध्ये भीषण आग लागली आणि आगीचे लोळ आकाशात पसरले.
विमानाचे झाले तकडे: अपघातानंतर हवाई पाहणीतून समोर आलेल्या दृश्यांमध्ये विमानाचा अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून आले. वाळवंटात विमानाचे अस्तित्वच संपले असून, आगीमुळे जमिनीचा मोठा भाग काळा पडला आहे. लष्कराच्या आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु आगीची तीव्रता इतकी होती की, कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. मृतांमध्ये कोणाचा समावेश?एडवर्ड्स एअर फोर्स बेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये लष्करी कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार (Contractors) असा 'मिक्स्ड क्रू' होता. बॉइंग कंपनीने देखील या दुर्घटनेत त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. लष्कराने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम नेमली असून, पुढील सहा महिने या प्रकरणाचा सखोल तपास केला जाऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. B-52 चे महत्त्व:'B-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस' हे अमेरिकेच्या ताकदीचे प्रतीक मानले जाते. १९५५ मध्ये हे विमान अमेरिकन सैन्यात सामील झाले असून, ते अण्वस्त्रांसह पारंपारिक बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. अनेक दशकांपासून हे विमान अमेरिकेच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा भाग राहिले आहे.
या दुर्घटनेमुळे अमेरिकन हवाई दलावर शोककळा पसरली असून, एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




