कोकणात संतापजनक प्रकार! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर सलग ७ महिने अत्याचार, वैभववाडी पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या!

वैभववाडी: कोकणातील वैभववाडी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिला पीडितेला तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिच्यावर सलग सात महिने सातत्याने सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी खांबाळे येथील चार तरुणांना गजाड केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, आरोपींनी पीडित विवाहितेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केले होते. ते व्हिडिओ इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच भयानक धमक्यांचा धाक दाखवून आरोपींनी गेल्या सात महिन्यांपासून वारंवार विवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सततच्या या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे पीडित महिला पूर्णपणे खचून गेली होती, परंतु अखेर तिने हिंमत दाखवत या प्रकरणी पोलिसांत जाऊन संपूर्ण आपबीती सांगितली.

पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत वैभववाडी पोलिसांनी तत्परतेने कायदेशीर कारवाई करत खांबाळे येथील चौघा नराधम तरुणांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विक्रांत रणजित पवार (वय २२), अक्षय कमलाकर चव्हाण (वय २८), परेश पंढरीनाथ साईल (वय २५) आणि तुषार सुरेश कर्पे (वय २४, सर्व रा. ता. वैभववाडी) अशी आहेत. पोलिसांनी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *