पुणे हादरले! खराडीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तर एकाच कुटुंबातील दोघे गंभीर जखमी

One Dead, Two Critically Injured After Domestic LPG Cylinder Blast in Kharadiपुण्यातील खराडी परिसरातील खांदवेनगर येथील 'फॉर्च्युन सिटी' इमारतीत शुक्रवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास घरगुती एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. ही घटना इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचा तपशील:
प्राथमिक माहितीनुसार, घरातील जुना सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर जोडताना गॅस गळती (Gas Leak) झाली. त्यानंतर सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आणि घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत पांडुरंग विष्णू गीते (३५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तसेच, विष्णू मुंजाजी गीते (८२) आणि वृंदाविनी विष्णू गीते (६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहिती मिळताच खराडी, धानोरी आणि येरवडा अग्निशमन केंद्रातून तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील हॉल, फर्निचर, टीव्ही, विद्युत वायरिंग आणि स्वयंपाकघरातील फ्रिजसह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. धुरामुळे फ्लॅटच्या भिंती काळ्या पडल्या असून संपूर्ण मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

 


सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये  https://punenews24.in/



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *