पुणे/केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव येथील बहुचर्चित बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटप्रकरणी आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास आता थेट संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून, स्थानिक यवत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हिडीओ व्हायरल, पण गुन्हा दाखल होण्यास महिनाभराचा उशीर!
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अण्णासाहेब गिरी हा केवळ १२ वी पास असून, तो गेल्या ५-६ वर्षांपासून हा गोरखधंदा करत होता. तो बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करायचा आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव (रा. वाघोली) हा गर्भपात करत होता. एप्रिल महिन्यात अण्णासाहेब गिरीचा गर्भलिंग निदान करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, इतका गंभीर पुरावा समोर असूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यानंतर, तब्बल महिनाभरानंतर २० मे रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होण्यापूर्वी पोलिसांसोबत हॉटेलमध्ये ऊठबस?
व्हिडीओ बाहेर आल्यापासून ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत अण्णासाहेब गिरी, त्याचे दलाल आणि काही स्थानिक डॉक्टरांचे यवत पोलीस ठाण्यात सातत्याने हेलपाटे सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा दाखल होण्याच्या अवघ्या ५-६ दिवस आधी, साध्या वेशातील पोलीस हवालदार दत्ता काळे आणि मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी हे एका हॉटेलमध्ये एकत्र बसले होते. त्यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे फोटो आता समोर आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या छुप्या पाठिंब्यामुळेच हा तपास रेंगाळला का, अशी दाट शंका उपस्थित होत आहे.
दलालांना पळून जाण्यासाठी मिळाला वेळ; गर्भपाताचे मुख्य केंद्र गुलदस्त्यातच
या प्रकरणात पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यानंतर गिरीला अटक केली आणि त्याचे आयफोन मोबाईल जप्त केले. मात्र, गिरीचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे दोन मुख्य दलाल अद्याप पोलिसांच्या रडारवर आलेले नाहीत. गुन्हा दाखल करण्यास आणि अटक करण्यास उशीर झाल्यामुळे या मुख्य दलालांना पसार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचे बोलले जात आहे. तसेच, गर्भलिंग निदानानंतर ज्या मुख्य रुग्णालयात किंवा केंद्रात गर्भपात केले जात होते, त्या मुख्य केंद्राचे नाव अद्याप तपासात समोर आणलेले नाही.
दुसरे मशीन गेले कोठे?
पोलिसांनी अण्णासाहेब गिरीच्या गाडीतून गर्भलिंग निदानाचे एक पोर्टेबल मशीन जप्त केल्याचे सांगितले आहे. परंतु, खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिरीकडे एक नव्हे तर दोन मशीन होत्या. मग पोलिसांच्या कारवाईत केवळ एकच मशीन कशी जप्त झाली आणि दुसरे यंत्र नेमके कोठे गायब झाले? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
एकंदरीत, या रॅकेटची पाळेमुळे ३ जिल्ह्यांत पसरलेली असतानाही, मुख्य सूत्रधार, दलाल आणि गर्भपात केंद्रे तपासाच्या कक्षेबाहेर राहिल्याने यवत पोलिसांच्या तपासावर आता चौफेर टीका होत आहे
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




