
Pune : पुरंदर येथील बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. या विमानतळासाठी ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास मान्यता दिल्याने एक जूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया सहमतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, पुरंदर विमानतळाच्या विकसनासाठी स्वतंत्र हेतू कंपनी (एसपीव्ही) स्थापना करण्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुरंदरच्या भूसंपादनासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारच्या बैठकीत 'हुडको' या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचा प्रस्तावाला मान्यता देतानाच, त्यासाठी हमी देण्यासही सरकारने मंजुरी दिली.
कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी 'एसपीव्ही'मधील सहभागीदारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या विशेष हेतू कंपनीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तसेच अन्य संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या भागीदारीनुसार कर्ज परतफेडीची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमआयडीसीच्या कायद्यातील कलम ३२(१) नुसार जमीन मोबदल्याची
या गावांतील जमिनी विमानतळासाठी घेणार
पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी. विमानतळासाठी एकूण ३ हजार एकर इतकी जमीन आवश्यक असून त्यापैकी २ हजार ८०० एकर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची संमती मिळाली आहे.
गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
पुरंदर विमानतळासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू असताना काही प्रकल्पविरोधी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याने त्या वेळी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्या बैठकीत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया नियमानुसार सुरू करण्यात आली आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel


1 thought on “Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी ६,००० कोटींचा निधी; जूनपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार, पुण्यात कोणत्या गावांमध्ये उभारला जाणार विमानतळ?”