
कोल्हापूर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर नवीन कर लादला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (MWRRA) २०२६-२०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जलशुल्क निश्चितीची प्रक्रिया सुरू केली असून, यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.
कोणत्या प्रकल्पांना बसणार फटका? या निर्णयाचा फटका दूधगंगा, वारणा, राधानगरी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना, तसेच कडवी, कासारी, कुंभी, धामणी या मध्यम प्रकल्पांवरील बागायतदारांना बसणार आहे. याव्यतिरिक्त, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी उपसा करणाऱ्या सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि वैयक्तिक बागायतदारांनाही आता सुधारित आणि वाढीव दराने जलशुल्क भरावे लागणार आहे.
शेतकऱ्यांचा विरोध: आधीच शेती व्यवसाय तोट्यात असताना पाण्याचा हा नवीन कर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा आघात करणारा आहे. यापूर्वीही अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला गेला होता, ज्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रस्ताव आल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा 'इरिगेशन फेडरेशन'चे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून, शुक्रवारी सिंचन भवनात सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन या प्रस्तावाविरुद्ध हरकती आणि आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाचे आवाहन: ज्या लाभार्थींना या प्रस्तावाबद्दल आपल्या सूचना किंवा हरकती नोंदवायच्या आहेत, त्यांनी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 'गुगल फॉर्म'द्वारे किंवा लेखी स्वरूपात संबंधित शाखा कार्यालयात आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर
- मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी! पंतप्रधान मोदींसोबतच्या 'हाय-व्होल्टेज' बैठकीत महाराष्ट्राच्या विकासकामांवर चर्चा; मोठ्या फाइल्ससह चर्चांना उधाण!
- सिंहगडाचा सुवर्णकाळ लिलावात कसा हरवला? १८७६ मध्ये ब्रिटिशांनी विकला होता महाराजांचा राजवाडा आणि रत्नशाळा!
- कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; डी. के. शिवकुमार आता राज्याचे नवे प्रमुख!
- पश्चिम बंगाल सीमेवर 'रिव्हर्स एक्झोडस'; बेकायदेशीर स्थलांतरितांची मायदेशी परतण्यासाठी झुंबड, काय आहे नेमके कारण?
महाराष्ट्र
- मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी! पंतप्रधान मोदींसोबतच्या 'हाय-व्होल्टेज' बैठकीत महाराष्ट्राच्या विकासकामांवर चर्चा; मोठ्या फाइल्ससह चर्चांना उधाण!
- सिंहगडाचा सुवर्णकाळ लिलावात कसा हरवला? १८७६ मध्ये ब्रिटिशांनी विकला होता महाराजांचा राजवाडा आणि रत्नशाळा!
- नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराला वाचवताना चार गाड्यांची धडक.
- कोकणातील 'हिडन जेम'! भर समुद्रात ६०० एकरावर पसरलेले रहस्यमयी 'जामडूल बेट'.
गुन्हा
- वाशीम: धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू!
- उत्तर प्रदेशातील बरेलीत धाडसी मोहीम! IPS अंशिका वर्मा आणि त्यांच्या महिला पथकाने ७२ तासांच्या चकमकीनंतर चिमुरड्याची केली सुटका!
- पुणे: वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा भीषण थरार: १९ वर्षीय तरुणाची कार गरवारे पुलावरून थेट खाली कोसळली!
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; डी. के. शिवकुमार आता राज्याचे नवे प्रमुख!
- विधान परिषद निवडणुकीचे 'महायुती'त जागावाटपाचे पेच; भाजपचा 'सिंहाचा वाटा', तर मित्रपक्ष असमाधानी!
- संजय राऊतांचा गौप्यस्फोट! "महायुतीत शिंदेंची कोंडी, सरकारमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती", विधान परिषद जागावाटपावरून खळबळ!
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
























Subscribe to my channel




