Four Drowned Including Pregnant Woman; 2-Year-Old Girl Miraculously Saved!

नाशिक हादरले! कश्यपी धरणात बुडून गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले.

Four Drowned Including Pregnant Woman; 2-Year-Old Girl Miraculously Saved!
नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेत पती-पत्नीसह शेजारील दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनेचा तपशील: मखमलाबाद नाका परिसरात राहणारे सचिन ठोंबरे (वय ३०) आपल्या गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि शेजारील दोन मुलांसोबत (केतन आणि कौशल्य) कश्यपी धरण परिसरात फिरायला गेले होते.
धरणाच्या निसर्गरम्य परिसरात फिरत असताना अचानक पाय घसरल्याने एक जण पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही खोल पाण्यात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले.

दोन वर्षांच्या चिमुकलीचे नशीब बलवत्तर: या घटनेत ठोंबरे दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी मात्र दैव बलवत्तर म्हणून वाचली. तिची आई रोहिणी पाण्याकडे जाताना या चिमुकलीला काठावर सोडून गेली होती.
मुलगी आई-वडिलांना पाण्याकडे बोट दाखवून 'मम्मी-पापा' म्हणत रडत असताना स्थानिक महिला संगीता घाडगे यांनी तिला पाहिले. त्यांनी वेळीच धाव घेऊन मुलीला सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला.

बचाव कार्य:घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर शोधकार्य राबवले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर चौघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटकांनी धरण किंवा जलाशयांच्या ठिकाणी जाताना अतिशय काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *