तेलंगणामधील गंगापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना: पतीच्या हत्येनंतर पत्नी आणि प्रियकराचे भयानक कृत्य!तेलंगणाच्या गंगापूर येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच पत्नीने आणि तिच्या प्रियकराने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव मुथ्यम रेड्डी असे असून, त्यांची पत्नी कल्पना आणि तिचा प्रियकर गैनी पांदारी यांनी संगनमताने हे हत्याकांड घडवून आणले.हत्येचे नेमके कारण काय?मुथ्यम रेड्डी आणि कल्पना यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कल्पनाचे शेजारील एलगोयी गावातील गैनी पांदारी याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. मुथ्यम रेड्डी यांना या संबंधांची माहिती मिळताच दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली.
आपले प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी या मार्गातील मुख्य अडथळा असलेल्या मुथ्यम रेड्डी यांना कायमचे संपवण्याचा कट कल्पना आणि पांदारी यांनी रचला. JCB चा वापर करून मृतदेह गाडलाहत्येच्या नियोजनानुसार, या दोघांनी मुथ्यम रेड्डी यांची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी गावाच्या बाहेरील एका शेतात जेसीबी मशिनने मोठा खड्डा खणला आणि मृतदेह त्यात गाडून टाकला. इतकेच नाही, तर संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्या जागेवर माती आणि दगड रचून ती जागा पूर्णपणे सपाट केली.
पोलिसांच्या तपासात उघड झाले सत्यहत्येचा गुन्हा लपवण्यासाठी कल्पनाने १८ मे रोजी खेड पोलीस ठाण्यात तिचा पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना कल्पनाच्या वर्तणुकीवर संशय आला. तिचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले असता, तिचे गैनी पांदारीसोबतचे वारंवार होणारे संवाद समोर आले. पोलिसांनी पांदारीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कटात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



