अजित पवार यांच्या निधनानंतर काहीच दिवसांनी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी साठी घाई केल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेनेही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शपथविधीवर शंका उपस्थित करत सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी असी शक्यता वर्तवली आहे. यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
काकींची इच्छा नसतानाही…
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘त्या नेत्यांकडे सत्ता आहे. राज्यात, ती मेंटेन ठेवण्यासाठी, ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्त्वाची वाटली असेल. मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचं लक्ष गेलं. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला ही आमची प्रायोरिटी आहे. काकी, पार्थ आणि जयलाही ही महत्त्वाची आहे. नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘रोहित पवार काही गोष्टी मांडत असेल तर त्याला अफवा म्हणत नाही. ही रोखठोक म्हणतात. ज्यांना कुणाला काही वाटतं ते वाटू द्या. ते चारपाच लोक वेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहे. आमच्या काकाचा अपघात कसा झाला, याची उत्तरे आम्हाला माहीत पाहिजे.’
शरद पवारांच्या विधानावर भाष्य
अजित पवार यांनी 28 तारखेला अजित पवारांच्या अपघातावर बोलताना हा केवळ एक अपघात असल्याचे म्हटले होते. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी 28 तारखेला स्टेटमेंट दिलं. अपघाताला सहा तास झाले असतील. मी 13 दिवसाने बोलतो. सहा तासात काय माहिती मिळणार. दुसऱ्या दिवशी लाखो लोक येणार होते. त्यामुळे अर्धवट माहिती दिली तर लाखो लोक काहीही करू शकले असते. तेवढी प्रगल्भता पवार साहेबांकडे आहे. म्हणून मी 13 दिवसानंतर मी बोलत आहे. काल साहेबांशी बोलणार होतो. पण त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे चर्चा झाली नाही. मी सतत सांगत होतो. ते साहेबांना माहीत होतं. त्यामुळे साहेबांनी मला काही विचारलं नाही. मीही त्यांना माहिती दिली नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हे मला कळतं.
[embedded content]
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!

























Subscribe to my channel


