मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी 'नवीन नागपूर' प्रकल्पाचा मार्ग सुकर; एनएमआरडीएकडून भूसंपादन प्रक्रियेला वेगनागपूर आणि विदर्भाच्या आर्थिक विकासाला मोठी गती देणाऱ्या आणि रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करणाऱ्या 'नवीन नागपूर' (New Nagpur) प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्ष मैदानावर मोठी गती मिळाली आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला असून, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (NMRDA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १९ खरेदी खत (रजिस्ट्री) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून एकूण ७८ एकर जमीन प्रशासनाला प्राप्त झाली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे.
लाडगावमधील शेतकऱ्यांच्या रजिस्ट्रीला सुरुवात:एनएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी प्रियदर्शनी बोरकर यांनी सांगितले की, हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी (रिठी) आणि मौजा लाडगाव (रिठी) या दोन गावांच्या शिवारात नवीन नागपूर हे आधुनिक शहर वसविले जात आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६९२ हेक्टर जागा संपादित करण्याचे उद्दिष्ट आहे. गोधणी गावातील १९ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात मोबदला देऊन जमीन ताब्यात घेण्यात आली असून, लाडगाव येथील शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्याची आणि रजिस्ट्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प नागपूरच्या वैभवात मोलाची भर टाकणारा असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
७ हजार ८०० कोटींच्या कर्जाला सरकारची हमी:'नवीन नागपूर' आणि त्यासोबतच बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी एनएमआरडीए, हुडको (HUDCO) आणि एनबीसीसी (NBCC) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी हुडकोकडून ७ हजार ८०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाने या कर्जासाठी अधिकृत राज्य हमी (State Guarantee) दिली आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचा आर्थिक पाया अत्यंत भक्कम झाला आहे.गुंतवणुकीसाठी उद्योजकांची उत्सुकता (सिंगल विंडो क्लिअरन्स):नवीन नागपूर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक आणि वित्तीय केंद्र (IBFC) उभारले जाणार आहे, ज्यामुळे माहिती तंत्रज्ञान (IT), लॉजिस्टिक्स आणि वित्तीय क्षेत्रात तब्बल ५ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच चार बड्या उद्योजकांनी येथे मोठ्या गुंतवणुकीसाठी एनएमआरडीएकडे अधिकृत चौकशी सुरू केली आहे. गुंतवणूकदारांना सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी येथे 'सिंगल विंडो क्लिअरन्स' म्हणजेच एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे या परिसराचा कायापालट होणार आहे.
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



