पुण्यातील एमपीएससी आंदोलनाचा तिढा कायम; आठ दिवस उलटले तरी सरकार आणि आंदोलकांमध्ये संवादच नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, या संपूर्ण कालावधीत आंदोलक विद्यार्थी आणि राज्य सरकार यांच्यात चर्चेची किंवा संवादाची एकही फेरी झालेली नाही. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे या आंदोलनाचा तिढा अधिकच जटीत झाला असून, विद्यार्थ्यांमधील असंतोष वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने एमपीएससीच्या कारभारात सुधारणा करण्यासोबतच अन्य महत्त्वाच्या मागण्या रेटण्यात येत आहेत. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आणि अधिकृत चर्चा किंवा मध्यस्थी न झाल्यामुळे या आंदोलनावर कोणता तोडगा निघणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे विद्यार्थी आपल्या मागण्यांवर अडून बसले आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून योग्य त्या संवादाचा अभाव असल्याने हे आंदोलन नेमके किती दिवस चालणार आणि यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही ठिकाणी नोटिसा बजावण्याच्या व कारवाईच्या हालचालीही सुरू असल्याचे समजते.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *