सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. आपल्या दीड वर्षाच्या लहान मुलासाठी बाजारातून डायपर आणण्यासाठी घरातून पडलेला २४ वर्षीय तरुण पुन्हा जिवंत परतलाच नाही. घरून निघाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेली माहितीनुसार, सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४ वर्षे, रा. नई जिंदगी, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुफियान हा फॅब्रिकेशनचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास सुफियान आपल्या घरातून मुलासाठी डायपर आणतो असे सांगून दुचाकीवरून बाहेर पडला होता. मात्र, घरून निघाल्यानंतर बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही, त्यामुळे कुटुंबीय काळजी करू लागले.
पनाश अपार्टमेंटजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह:
दरम्यान, विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटच्या परिसरात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे समोर आले. सुफियानच्या शरीरावर, विशेषतः डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्याचे हात-पाय मोडलेले दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
मोबाईलच्या रिंगमुळे कुटुंबाला समजली बातमी:
सुफियान वेळेत घरी न पोहोचल्याने काळजीग्रस्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सुफियानच्या खिशातील वाजत असलेला फोन उचलला आणि समोर बोलत असलेल्या नातेवाईकांना या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फोन उचलून जेव्हा विचारणा केली आणि घटनेची माहिती दिली, तेव्हा सुफियानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लेकरासाठी डायपर आणायला गेलेल्या सुफियानचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याचे ऐकून संपूर्ण कुटुंब सुन्न झाले आहे.
हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? सुफियानने पनाश अपार्टमेंटवरून उडी मारून आत्महत्या केली की त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या करून मृतदेह तिथे टाकण्यात आला? तो डायपर आणण्याचे सांगून विजापूर रोड परिसरातील या इमारतीजवळ का गेला होता? या सर्व प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू केला आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




