चिखलदरा/अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील वन विभाग तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या (Melghat Tiger Reserve) संरक्षित जंगलात बुधवारी सकाळपासून अत्यंत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेळघाटात हा वणवा पेटला असून, यामध्ये हजारो हेक्टरवरील मौल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे. या भीषण आगीमुळे मेळघाटातील दुर्मिळ वनस्पती, औषधी वेली, वन्यजीव आणि संपूर्ण पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून अनेक दुर्गम भागांत आग अजूनही धगधगत आहे.
रोरा, सेमाडोहसह अनेक भागांत वणव्याचे तांडव
मिळालेली माहिती अशी की, धारणी व चिखलदरा तालुक्यातील रोरा, भवई, सेमाडोह, एकताई, हतरू आणि मांगिया या सर्वच वनपरिक्षेत्रातील जंगलात एकाच वेळी आग लागल्याचे समोर आले आहे. विशेषतः भवई ते सेमाडोह दरम्यानच्या अतिदुर्गम खोऱ्यात आणि डोंगराळ भागात जंगलाने रौद्र रूप धारण केले आहे. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट मैलोनमैल दुरून नजरेस पडत आहेत. या आगीच्या विळख्यात मेळघाटातील मोठा अतिसंरक्षित जंगल परिसर सापडल्याने अस्वल, बिबट्या, हरिण, चौशिंगा यांसारख्या वन्यजीवांचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्राणही कमालीची धोक्यात आले आहेत.
युद्धपातळीवर आदेश; सामाजिक संस्थेची तत्परता
मेळघाटातील या अतिशय गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जंगलाला लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांना तातडीने संपर्क करून माहिती दिली. क्षेत्र संचालकांनी याची त्वरित दखल घेत मेळघाट अंतर्गत येणाऱ्या धारणी, चिखलदरा आणि परतवाडा येथील सर्व उपवनसंरक्षकांसह (DFO) वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कडक आदेश दिले आहेत.
अतिरिक्त यंत्रणा आणि मनुष्यबळाची गरज
वणवा रोखण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असला, तरी सध्या मेळघाटातील आगीची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. स्थानिक वनमजूर आणि 'अंगारी' कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु दुर्गम भाग आणि वाऱ्याचा वेग यामुळे अडचणी येत आहेत. वन विभागाने तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ, आधुनिक अग्निशमन साहित्य आणि सॅटेलाइट अलर्ट यंत्रणा सचेत करून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणावी, जेणेकरून पुढील मोठी पर्यावरणीय हानी टाळता येईल, अशी तीव्र मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




