मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार

 

मध्य प्रदेश: एक अत्यंत खळबळजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाहरियर जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका ६० वर्षीय वकीलाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्‍न सिंग यादव (वय सुमारे ६० वर्षे) असे मृत वकीलाचे नाव आहे. ते पेशाने वकील होते. मध्य प्रदेशातील भितारवार शहरातील दबरा रोडवरील एका हॉटेलजवळ (खाद्यगृहाजवळ) हे हल्लेखोर येऊन लपले होते. दुपारी अचानक तीन सशस्त्र जणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात वकिल यादव यांना ३ गोळ्या लागल्या, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी ग्वाहरियर शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जमिनीच्या वादातून हत्या असल्याची शक्यता
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत वकील रत्‍न सिंग यादव यांचा काही व्यक्तींसोबत जुन्या जमिनीचा वाद सुरू होता. याच जमिनीच्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून ही सुपारी देऊन किंवा हत्येचा कट रचून गोळीबार करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *