आंध्र प्रदेश: चित्तूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २३ वर्षीय रमेश या तरुणाची त्याच्याच पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून निर्घृण हत्या केली. रमेश हा मूळचा तामिळनाडूचा होता आणि पत्नी हसिनीसह (वय १९) त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. हसिनीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत, युगंधर (वय २०) सोबत प्रेमसंबंध होते. हसिनीने पतीला अमावस्येनिमित्त मल्लप्पा कोंडा येथील मल्लेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी जाण्यास प्रवृत्त केले. वाटेत तिने आपले 'लाईव्ह लोकेशन' प्रियकर युगंधरला पाठवून त्याला कटात सामील करून घेतले.
घाटाच्या रस्त्यावर हसिनीने मुद्दाम आपली बॅग खाली टाकली, जेणेकरून पती रमेशने गाडी थांबवावी. रमेशने गाडी थांबवताच युगंधर आणि त्याच्या साथीदारांनी लपून हल्ला केला. रमेशने वाचण्यासाठी जंगलात पळ काढला, मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. या घटनेच्या वेळी त्यांची एक वर्षाची चिमुरडी मुलगीही तिथेच होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हसिनी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
शहर
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
महाराष्ट्र
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
- कोल्हापुर: भीषण अपघात: ट्रकने दुचाकीला दिली धडक; महिलेला १०० फूट फरपटत नेल्याने जागीच मृत्यू
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- नीट (NEET) निकालात मोठा गोंधळ: कानपूरच्या विद्यार्थिनीचा दावा; सुरुवातीला ६०९, नंतर ५४० आणि शेवटी १६७ गुण मिळाल्याचे दाखवले"




























Subscribe to my channel




