Big Relief for Divyangjan: Govt Announces Major Decision for Beneficiaries Without UDID Cards

मुंबई: युडीआयडी कार्डची चिंता मिटली! शासनाचा मोठा दिलासा; लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना होणार फायदा

Big Relief for Divyangjan: Govt Announces Major Decision for Beneficiaries Without UDID Cards
मुंबई: दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे काही ठिकाणी अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे राज्यातील सुमारे १.५० लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर योजनांचे लाभ विनाव्यत्यय सुरू राहतील. ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही.

या कालावधीत लाभार्थ्यांना नवीन कार्ड काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य देखील केले जाणार आहे. कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *