NEET Paper Leak Case: CBI Raids Latur Tuition Hub; Retired Professor Detained as Probe Intensifies.

नीट पेपरफुटीचं 'लातूर कनेक्शन'! सीबीआयकडून निवृत्त प्राध्यापकासह खाजगी क्लास चालकाच्या घरावर छापे.

NEET Paper Leak Case: CBI Raids Latur Tuition Hub; Retired Professor Detained as Probe Intensifies.
लातूर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूर शहराचे कनेक्शन अधिक गडद झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी लातूरमध्ये धडक देऊन मोठी कारवाई केली.

सीबीआयचे धाडसत्र: मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने लातूरमधील एका खाजगी शिकवणी वर्गाच्या (Private Tuition) चालकाच्या घरावर आणि एका स्थानिक महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकाच्या निवासस्थानी छापे टाकले.

या कारवाईदरम्यान संबंधित प्राध्यापकाला सीबीआयने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. नेमका आरोप काय?लातूर येथील एका पालकाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती की, एका खाजगी क्लासने घेतलेल्या 'मॉक टेस्ट'मधील ४२ प्रश्न हे प्रत्यक्ष 'नीट' परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळणारे होते. ताब्यात घेतलेला निवृत्त प्राध्यापक हा केमिस्ट्रीच्या पेपर सेटिंग प्रक्रियेशी किंवा मराठी भाषांतराच्या समितीशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासादरम्यान पोलिसांनी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.

यापूर्वी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथूनही काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. लातूर शहर हे खाजगी शिकवणी वर्गांचे मोठे केंद्र (Coaching Hub) असल्याने या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या पेपरफुटीमागे एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सीबीआय आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.



शहर

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *