Shocking Negligence: 2-Month-Old Dies After Vaccination; Grandfather Forced to Hold Body All Night as Hospital Denies Entry to Morgue.

प्रशासनाचा पाषाणहृदयी चेहरा: लसीकरणानंतर चिमुरडीचा अंत, मृतदेह शवगृहात ठेवण्यास नकार दिल्याने आजोबांची रात्र नातीच्या मृतदेहासह मांडीवर.

Shocking Negligence: 2-Month-Old Dies After Vaccination; Grandfather Forced to Hold Body All Night as Hospital Denies Entry to Morgue.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील एका अडीच महिन्यांच्या चिमुरडीचा लसीकरणानंतर मृत्यू झाला. मात्र, शासकीय रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे तिच्या आजोबांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रुग्णालयाबाहेर बसावे लागले.

नेमकी घटना काय? टाकळी येथील सचीता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला मंगळवारी स्थानिक जिल्हा परिषद शाळेत पेन्टासह इतर लसीकरण करण्यात आले होते. लस टोचल्यानंतर काही वेळातच सचीताची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सचीताचे वडील भारतीय सैन्यात असून सध्या अयोध्येत तैनात आहेत.

रुग्णालयाचा अमानवीयपणा:शवविच्छेदनासाठी सचीताचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) आणण्यात आला. रात्र झाल्याने शवविच्छेदन सकाळी होणार होते.

मृतदेह सुरक्षित राहावा यासाठी तिचे आजोबा तुळशीराम मराठे यांनी तो शवगृहातील फ्रीझरमध्ये ठेवण्याची विनंती केली. मात्र, कागदपत्रांचे आणि तांत्रिक कारणांचे दाखले देत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, आपल्या लाडक्या नातीच्या निधनाने खचलेल्या आजोबांना रात्रभर त्या चिमुरडीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन गृहाबाहेर काढावी लागली. सकाळी जेव्हा हा प्रकार उघड झाला, तेव्हा रुग्णालयाच्या या निष्ठुरतेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “प्रशासनाचा पाषाणहृदयी चेहरा: लसीकरणानंतर चिमुरडीचा अंत, मृतदेह शवगृहात ठेवण्यास नकार दिल्याने आजोबांची रात्र नातीच्या मृतदेहासह मांडीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *