नाशिक (मालेगाव): नाशिक-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी एक अत्यंत थरारक घटना घडली. शहादा आगाराची पुणे-शहादा ही एसटी बस (MH 14 MH 2310) नेहमीच्या मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने चांदवडमार्गे मालेगावकडे जात होती. उमराणे गावातील रामदेव बाबा मंदिराजवळ आली असता, चालकाला अचानक भोवळ (चक्कर) आली. यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि ६० प्रवाशांनी भरलेली ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन झाडांवर आदळून थेट एका खोलगट भागात पलटी झाली. अपघाताचा आवाज होताच उमराणे परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.
प्रसंगावधान राखून त्यांनी बसच्या काचा फोडल्या आणि आत अडकलेल्या ५८ प्रौढ प्रवाशांना व २ चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात बस चालक राकेश दिलीप बुवा आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, इतर १० ते ११ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने बसचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. उमराणे येथील स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ६० प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
शहर
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
- दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
- पुणे: धरणसाखळीत १७ TMC पाणी, तरीही पाणीकपात का? सजग नागरिक मंचाचा मनपाला थेट सवाल
महाराष्ट्र
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
- महाराष्ट्र: मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा, एसटीला नवे बळ; विकासकामांनाही गती
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात


























Subscribe to my channel


