अमरावती: स्वतःचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) सुधारून व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याच्या हव्यासापोटी एकाने आपल्या जिवाभावाच्या मित्राचीच लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मित्रत्वाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेची शहरात चर्चा सुरू आहे.
नेमकी घटना काय?
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ एप्रिल २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी विपुल (नाव बदललेले) आणि आरोपी राहुल हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. राहुलला स्वतःच्या व्यवसायासाठी मोठ्या कर्जाची गरज होती, मात्र त्याचा सिबिल स्कोअर कमी असल्याने बँकांकडून त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या.
अशी केली फसवणूक:
आपला सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी राहुलने विपुलकडे एक अजब गळ घातली. "तुझे सोन्याचे दागिने मला दे, मी ते बँकेत गहाण ठेवून कर्ज काढतो आणि त्याचे हप्ते नियमित भरतो, ज्यामुळे माझा सिबिल रेकॉर्ड सुधारेल," असा विश्वास राहुलने विपुलला दिला. मित्रावर विश्वास ठेवून विपुलने आपले लाखो रुपयांचे दागिने राहुलच्या स्वाधीन केले.
पोलीस तक्रार:
काही काळानंतर राहुलने दिलेला शब्द पाळला नाही आणि दागिने परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. विश्वासाने दिलेले दागिने बुडाल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विपुलने गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- गोवा: रिवोणा बाजारपेठेला आगीचा विळखा; ४ दुकाने, २ हॉटेल्स जळून खाक
- कोल्हापूर: नामकरणाच्या आनंदावर शोककळा! चिमुकलीच्या बारशाआधी आईने उचलले टोकाचे पाऊल
- नागपुर: ड्रग्ज तस्करीवर मोठा घाव! २८ ग्रॅम एमडी पावडरसह आरोपी जेरबंद
- राजस्थान: आईच्या हत्येनंतर आता वडिलांच्या मृत्यूचाही संशय! जयपूर हत्याकांडाला नवं धक्कादायक वळण
महाराष्ट्र
- कोल्हापूर: नामकरणाच्या आनंदावर शोककळा! चिमुकलीच्या बारशाआधी आईने उचलले टोकाचे पाऊल
- नागपुर: ड्रग्ज तस्करीवर मोठा घाव! २८ ग्रॅम एमडी पावडरसह आरोपी जेरबंद
- पुणे: खडकवासला धरणसाखळीत १६.८० TMC पाणीसाठा; तरीही गेल्या वर्षापेक्षा ४ TMC कमी
- मुंबई: एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव गुदमरला! १५ मिनिटे AC बंद; मुलुंड स्थानकात महिला बेशुद्ध
गुन्हा
- झारखंड: ३ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फक्त ₹१ लाखांचा दंड; त्याच पैशांत दारू-मटणाची पार्टी
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.


























Subscribe to my channel



