Nashik's Real-Life Hero: Harshal Chaudhary Beats Pain, Scores 77% in SSC Despite Giving Exam from Ambulance

नाशिकच्या हर्षलची जिद्द! अपघात झाला, पाय फ्रॅक्चर तरीही रुग्णवाहिकेतून दिली परीक्षा; १०वीत मिळवले ७७ टक्के गुण

Nashik's Real-Life Hero: Harshal Chaudhary Beats Pain, Scores 77% in SSC Despite Giving Exam from Ambulanceनाशिक: जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे नाशिकच्या हर्षल चौधरी या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. दहावीच्या परीक्षेचे अवघे तीन पेपर बाकी असताना भीषण अपघात होऊनही, हर्षलने हार मानली नाही. त्याने चक्क रुग्णवाहिकेतून (Ambulance) प्रवास करत परीक्षा दिली आणि आज जाहीर झालेल्या निकालात ७७.६० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

हर्षल चौधरी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील असून शिक्षणासाठी नाशिकमध्ये आपल्या काकांकडे राहतो. तो 'रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूल'चा विद्यार्थी आहे. दहावीचे पेपर सुरू असतानाच एका दुचाकीने हर्षलच्या सायकलला धडक दिली, ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता, मात्र वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये म्हणून हर्षलने परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या या जिद्दीला कुटुंबिय आणि शाळेनेही खंबीर साथ दिली. हर्षलला रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रावर नेण्यात आले. शारीरिक वेदना बाजूला सारून त्याने शेवटचे तीन पेपर पूर्ण केले. आज जेव्हा निकाल लागला, तेव्हा हर्षलने ७७ टक्क्यांहून अधिक गुण मिळवल्याचे पाहून सर्वांचे डोळे पाणावले. प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळवलेले हे यश सध्या संपूर्ण नाशिकमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.

 



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *