बार्शी: कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आणि अॅलोपॅथी उपचारांचा अधिकार नसताना मागील दोन दशकांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाने छापा टाकून जेरबंद केले आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे ही खळबळजनक कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
छापा टाकताच बिंग फुटले
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ५ मे रोजी सकाळी १० वाजता उपळाई येथील 'प्रिन्स क्लिनिक'वर छापा टाकण्यात आला. शंकर मनोहर पाठक उर्फ डॉ. एस. एम. पाठक (ज्याने क्लिनिकबाहेर बी.ए.एम.एस.चा बोर्ड लावला होता) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
जप्त केलेले साहित्य:
मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथीची इंजेक्शन्स आणि औषधे.
सलाईन साठा आणि प्रिन्स क्लिनिकचे लेटर पॅड.
उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन रूम सील करण्यात आल्या आहेत.
रुग्णाच्या मृत्यूचा गंभीर आरोप
या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. पाठक याने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे तानाजी नरहरी सुतार (वय ५८, रा. उपळाई ठोंगे) या इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अयोग्य उपचारामुळे सुतार यांची प्रकृती वेगाने खालावली आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा अंत झाला, असा दावा करत संतप्त नातेवाईकांनी या बोगस डॉक्टरला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा प्रशासनाचा अॅक्शन प्लॅन
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संपूर्ण जिल्ह्यात आता बिनपरवाना आणि बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला आपापल्या क्षेत्रातील संशयित डॉक्टरांची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागात वैद्यकीय पदवी नसतानाही सर्रास प्रॅक्टिस करणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध आरोग्य प्रशासनाने आता कायमस्वरूपी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- नाशिक हादरले! टीसीएस धर्मांतर प्रकरणात 'मिशन कन्व्हर्जन'चा संशय; मुख्य आरोपी निदा खान फरार, एसआयटीकडून शोध सुरू
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- वृक्षवल्लीची साथ, तरच उन्हाची मात! सोलापुरात झाडे असलेल्या आणि नसलेल्या रस्त्यांवरील तापमानात ३ अंशांचा फरक
- नाशिक हादरले! २५ लाखांची मागणी अन् जादूटोण्याची धमकी; छळाला कंटाळून विवाहितेची जीवनयात्रा संपली, पतीसह दोघे अटकेत
महाराष्ट्र
- काळजाचा थरकाप! हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ; २३ वर्षीय विवाहितेची चिठ्ठी लिहून विहिरीत उडी!
- घरकुल मंजुरीसाठी लाचेची मागणी; सावरगावचा ग्रामरोजगार सेवक नाशिक एसीबीच्या जाळ्यात!
- जळगाव हादरले! पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने संपवला संसार; गळा आवळून केली निर्घृण हत्या!
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
गुन्हा
- घरकुल मंजुरीसाठी लाचेची मागणी; सावरगावचा ग्रामरोजगार सेवक नाशिक एसीबीच्या जाळ्यात!
- जळगाव हादरले! पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने संपवला संसार; गळा आवळून केली निर्घृण हत्या!
- नाशिक हादरले! टीसीएस धर्मांतर प्रकरणात 'मिशन कन्व्हर्जन'चा संशय; मुख्य आरोपी निदा खान फरार, एसआयटीकडून शोध सुरू
- नाशिक हादरले! २५ लाखांची मागणी अन् जादूटोण्याची धमकी; छळाला कंटाळून विवाहितेची जीवनयात्रा संपली, पतीसह दोघे अटकेत
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?




















Subscribe to my channel




