मुंबई: राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची ओळख एक प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, मात्र आजची परिस्थिती अत्यंत भीषण असून राज्याच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. या गंभीर विषयावर त्यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात 'शक्ती कायद्या'ची तात्काळ अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली आहे.
पुण्यातील घटनांनी महाराष्ट्र हादरला
पुण्यातील नसरापूर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट असतानाच, शहराच्या मध्यवर्ती भागात एका ९ वर्षीय मुलीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे जनमानसात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी राज्यपालांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
'शक्ती कायदा' केंद्र सरकारकडे धूळ खात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर 'शक्ती कायदा' मंजूर करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने गेल्या तीन वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे मंजुरीविना पडून आहे. "भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा," अशी मागणी गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज
मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग आणि 'पोक्सो' अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची वाढती संख्या राज्यासाठी शरमेची बाब आहे. वर्षा गायकवाड यांनी सध्याच्या गृहविभागाच्या कामकाजावरही बोट ठेवले आहे. "सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा अवाढव्य भार असल्याने गृहविभागाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महाराष्ट्राला आज एका सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
केवळ इव्हेंटबाजी नको, सुरक्षा हवी
महायुती सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, "सरकार 'लाडकी बहीण' म्हणत केवळ इव्हेंटबाजी करत आहे. पण बहीण फक्त कागदावर लाडकी असून चालत नाही, तर ती रस्त्यावर, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचे आहे." महिलांच्या सुरक्षेसाठी कागदी घोषणांऐवजी ठोस कृतीची गरज असल्याचे त्यांनी पत्रात आवर्जून नमूद केले आहे.
शहर
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
- पुणे: हिंजवडीजवळ पुराचा कहर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; NDRF ने २५ नागरिकांची केली सुखरूप सुटका
- नाशिक: सिन्नरमध्ये एफडीएचा धडक छापा; दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी १७ लाखांची पावडर जप्त!
महाराष्ट्र
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
- पुणे: हिंजवडीजवळ पुराचा कहर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; NDRF ने २५ नागरिकांची केली सुखरूप सुटका
- नाशिक: सिन्नरमध्ये एफडीएचा धडक छापा; दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी १७ लाखांची पावडर जप्त!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



