सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडदेगाव परिसरात पैशांच्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दत्ता नागनाथ बागल (वय ३८) या तरुणाचा मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कामती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
वडदेगाव येथील विठ्ठल बागल यांच्या शेतात महादेव गुंड नावाचा गडी कामाला आहे. महादेवने गावातीलच मंगेश सुरेश डोंगरे याच्याकडे आपले उसने दिलेले पैसे मागितले होते. पैसे मागितल्याचा राग मंगेशच्या मनात होता. याच वादातून सोमवारी सकाळी मंगेश डोंगरे आणि त्याचा साथीदार समर्थ जगताप हे वडदेगाव-औंढी रोडवरील कालव्यावर पोहोचले.
निर्घृण हत्या आणि हल्ला:
तिथे चर्चा सुरू असताना वादाची ठिणगी पडली. मंगेशने दत्ता बागल यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार चाकूने पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात दत्ता तिथेच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मामाला वाचवण्यासाठी आलेला समाधान जाधव (वय २५) याच्यावरही आरोपीने हल्ला केला. समाधान सध्या गंभीर जखमी असून त्याच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांची कारवाई:
घटनेची माहिती मिळताच कामती पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून मुख्य आरोपी मंगेश डोंगरे आणि त्याचा साथीदार समर्थ जगताप या दोघांनाही अटक केली आहे. विठ्ठल बागल यांच्या फिर्यादीवरून हत्येचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.
शहर
- पुण्यात संतापजनक घटना: पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; नराधमाचे कृत्य
- हडपसर १५ नंबर चौकात क्रेडिट कार्ड वसुलीवरून राडा – सविस्तर, गहन विश्लेषणात्मक लेख
- मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपयांचे बक्षीस
- जुन्नरमध्ये उष्माघाताचा विळखा; तरुण महिला शेतकरी रुपाली गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- शिक्षण विभागाचा अजब कारभार! पिंपरी-चिंचवडमधील १० वी, १२ वीचे १,३२२ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
- पिंपरी-चिंचवडमध्ये राडा: 'कामाचे पैसे हवेत का?' असे म्हणत चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण
- पुण्यात संतापजनक घटना: पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; नराधमाचे कृत्य
- रत्नागिरीत भीषण अपघात: देवरुख-पांगरीजवळ दोन तरुणांचा मृत्यू; तीन चिमुकल्या मुलींनी गमावले पित्याचे छत्र
गुन्हा
- पिंपरी-चिंचवडमध्ये राडा: 'कामाचे पैसे हवेत का?' असे म्हणत चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण
- पुण्यात संतापजनक घटना: पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; नराधमाचे कृत्य
- हडपसर १५ नंबर चौकात क्रेडिट कार्ड वसुलीवरून राडा – सविस्तर, गहन विश्लेषणात्मक लेख
- कोल्हापुरात खळबळ: कॉलेज तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




