प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक आहे. व्यक्ती समाजातच जगत असतो. दोन किंवा अधिक व्यक्तींनी समाज बनतो. समाजाशी फारसा संबंध नसणारे व्यक्ती सुद्धा दिसतात, परंतु ते ही अप्रत्यक्ष रूपाने अथवा उदासीनपणे समाजातच असतात हे मान्य करावेच लागेल. साधारणपणे एका क्षेत्रामध्ये एका भागात राहणाऱ्या अनेक असंख्य अशा लोकांच्या समुदायाला समाज म्हटलं जातं. परंतु ही व्याख्या पुरेशी आहे असे वाटत नाही. समाज म्हणायचं तर लोकांचा परस्पर संबंध असावा लागतो. एका क्षेत्रामध्ये एका गावामध्ये हजारो व्यक्ती राहत असतील परंतु त्यांच्यात परस्पर संबंध नसेल तर त्याला समाज म्हणता येत नाही. याचाच अर्थ एका समुदायातील अनेक व्यक्ती परस्पर सहकार्याच्या सूत्रामध्ये बांधलेले असतील तरच त्यांनी समाज बनतो. केवळ गर्दीला समाज म्हणता येत नसते. परस्पर सहकार्याच्या बंधनात असलेल्या पाच दहा व्यक्तींचा सुद्धा समाज होऊ शकतो. जितका काही स्वार्थ असतो तो आपला स्वतःचा परंतु जेवढे सहकार्य असते ते इतरांसाठी. म्हणून समाजाच्या जडणघडणीमध्ये परस्पर सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रमुख तत्व बनते. समाजभान (Social Awareness) प्रत्येक व्यक्तीला समस्या असतात परंतु त्यात काही समस्या व्यक्तिगत असतात, तर काही समस्या या समुदायाशी निगडित म्हणजेच सामाजिक असतात. व्यक्तींच्या परस्पर संबंध आणि व्यवहारामुळे काही समस्या समुदायात निर्माण होतात, त्या समस्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यवहार करण्याचा पद्धती व स्वभावाशी निगडित असतात. म्हणून व्यक्ती समाजात इतरांशी कशा पद्धतीने व्यवहार करतो, कसे वागतो याचा परिणाम सामाजिक समस्यांच्या स्वरूपात उद्भवतो. मानवाला काही अधिकार निसर्गदत्त तर काही अधिकार घटनेने दिलेले असतात. एक मानव म्हणून जगण्यासाठी काही सुविधा गृहीत असतात आणि घटनेने दिलेले अधिकार, हे सगळे म्हणजेच मानवाधिकार यांचे समाजातील कोणाकडून उल्लंघन होत असेल तर या घटकांचा सुद्धा सामाजिक समस्येमध्ये संबंध येतो. काही अधिकार केवळ मात्र आपल्यालाच दिलेले आहेत आणि ते फक्त आपणच वापरून जगावे आणि इतरांच्या त्या अधिकाराबद्दल उदासीन असणे आणि तसा स्वार्थपूर्ण व्यवहार करणे हे साफ चुकीचे आहे. म्हणूनच समाजभान म्हणजे समाजातील समस्या, गरजा, मानवी हक्क आणि आपली सामाजिक जबाबदारी यांची जाण असणे होय. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन, सामाजिक आरोग्य राखण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी जागरूक राहून सक्रिय योगदान देणे म्हणजे समाजभान होय. समाजभान म्हणजे काय :
हे खालील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट होते: १: नागरिक कर्तव्य : एक नागरिक म्हणून समाजात जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपले हक्क जपण्यासाठी धडपडत असतो मात्र समाजाप्रती असलेली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हे देखील महत्त्वाचे असते , ही जाण या ठिकाणी त्याला असावी. २: जागरूकता: समाजात काही परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, अयोग्य प्रथा, कुप्रथा, केवळ स्वार्थ भावनेने, अनैतिक मार्गाने केलेले आर्थिक अर्जन म्हणजे भ्रष्टाचार, आणि अन्य समस्यांवर लक्ष ठेवून त्याविरोधात आवाज उठवणे, ही जागरूकता व्यक्तिमध्ये असायला हवी. ३: सामाजिक समतोल: जातीय, धार्मिक, अनेक प्रकारच्या विषमता, या भिंती झुगारून समाज एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आपले सामाजिक कर्तव्य समजून करणे. ४: संवेदनशीलता: समाजात सर्वच घटक सबल असतात असे नाही, दुर्बल, पिडीत, दुर्लक्षित लोकांबद्दल मानवीय संवेदना असणे आणि गरजू लोकांच्या वेदनेची जाणीव ठेवून मदतीचा हात देणे. ५: पर्यावरण आणि विकास: आपले सर्व अधिकार घेऊन पृथ्वीवर आणि समाजात जगत असताना आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा समतोल ठेवणे, हवा, पाणी प्रदूषित न करणे, संतुलित जीवन जगत शाश्वत विकासाचा विचार करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजभानाचे महत्त्व:
समाजात वावरताना आपण एकमेकांवर अवलंबून असतो, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी समाजभान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे व्यक्तीला निस्वार्थ समाजसेवेकडे प्रवृत्त करते आणि सकारात्मक बदलासाठी प्रेरित करते. आपल्या जगण्याचा दृष्टिकोन केवळ आपणच जगणे हा असताना सुद्धा इतरांचे जगणे देखील महत्त्वाचे आहे आणि त्यांनाही सर्व प्रकारचे नैसर्गिक, जन्मजात, घटनेने दिलेले अधिकार आहेत, पृथ्वीतलावरील केवळ मानवाचेच नव्हे तर सर्व जीवांचे जीवन महत्त्वाचे आहे, ते परस्पर सहकार्याने जगत असतात , सर्व जीव एकमेकावर तेव्हा अस्तित्वाने उपकार करत जगत असतात. मोकळा श्वास घेत जगण्याचा अधिकार सर्वांचाच आहे, या सर्व नैतिक जबाबदारीची जाणीव असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. (संपर्कः 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




