Nashik Horror: Youth Brutally Murdered Over Refusal to Give Cigarette; History-Sheeter Arrested

नाशिक: धक्कादायक! सिगारेट देण्यास नकार दिला म्हणून तरुणाची निर्घृण हत्या; पंचवटीतील पेठ रोड परिसरातील घटना

Nashik Horror: Youth Brutally Murdered Over Refusal to Give Cigarette; History-Sheeter Arrestedनाशिक: नाशिक शहरात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल कृष्णा राऊत (रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१८ एप्रिल) रात्री राहुल राऊत हा आपल्या मित्रांसह नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ बसलेला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर (२६) हा तिथे आला आणि त्याने राहुलकडे "मला पण एक सिगारेट घे रे," अशी मागणी केली. राहुलने सिगारेट देण्यास नकार दिल्याने रोहिदासचा राग अनावर झाला. त्याने जवळ असलेल्या चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले.

उपचारादरम्यान मृत्यू:
हल्ल्यानंतर राहुल गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. राहुलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिदास आहेर विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार:
हल्ला करणारा रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घरफोडी आणि मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *