पुणे/लोणावळा: थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा एक मोठा 'व्हिला बुकिंग स्कॅम' उघडकीस आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षक बंगले आणि व्हिलाचे फोटो दाखवून पर्यटकांना जाळ्यात ओढले जात असून, हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे.
काय आहे हा स्कॅम?
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरटे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोणावळ्यातील आलिशान व्हिला आणि स्विमिंग पूल असलेल्या बंगल्यांचे फोटो टाकतात. पर्यटक जेव्हा या फोटोंना भुलून बुकिंगसाठी संपर्क साधतात, तेव्हा त्यांना २० ते २५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आगाऊ रक्कम (Advance) भरण्यास सांगितले जाते. पर्यटकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे भामटे गुगल मॅपचे 'लाईव्ह लोकेशन' देखील पाठवतात.
प्रत्यक्षात काय घडते?
मुंबईतील मयूर भानुशाली या पर्यटकाने अशाच प्रकारे ऑनलाईन बुकिंग केले होते. मात्र, जेव्हा ते सहकुटुंब लोणावळ्यात त्या लोकेशनवर पोहोचले, तेव्हा तिथे कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे समोर आले. अशाच प्रकारे अनेक पर्यटकांना हजारोंचा आर्थिक फटका बसला आहे. हे स्कॅम करणारे भामटे बहुधा लोणावळ्याच्या बाहेरील असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पोलिस आणि स्थानिक व्यावसायिकांचे आवाहन:
१. अधिकृत वेबसाइट्स वापरा: केवळ ओळखीच्या किंवा नामांकित आणि अधिकृत ट्रॅव्हल वेबसाइट्सवरूनच बुकिंग करा.
२. थेट संवाद करा: सोशल मीडियावरील वैयक्तिक खात्यांवर पैसे पाठवणे टाळा.
३. शहानिशा करा: बुकिंग करण्यापूर्वी संबंधित व्हिला किंवा हॉटेलचा अधिकृत संपर्क क्रमांक शोधून खात्री करा.
४. सत्यता तपासा: गुगल रिव्ह्यू आणि स्थानिक रेटिंग तपासा.
या वाढत्या फसवणुकीमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना सतर्क राहण्याचे आणि फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




