
पुणे (वाघोली): पुण्यातील वाघोली परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हुंड्याची मागणी आणि कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या तगाद्याला कंटाळून २१ वर्षीय विवाहिता प्रतीक्षा जयसिंग कदम हिने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. विशेष म्हणजे, प्रतीक्षा ही लहानपणापासून ज्या आत्याकडे लहानाची मोठी झाली, त्याच आत्याच्या मुलाने आणि आत्याने तिचा छळ केल्याचा आरोप आहे.
नेमके प्रकरण काय?
प्रतीक्षाचे वडील बन्सी खामकर (रा. केज, जि. बीड) हे ऊसतोड कामगार आहेत. कामाच्या व्यापा मुळे त्यांनी प्रतीक्षाला लहानपणीच वाघोली येथील तिची आत्या हौसाबाई कदम यांच्याकडे राहायला पाठवले होते. तिथेच ती मोठी झाली आणि तिचे शिक्षणही झाले. ९ मे २०२३ रोजी प्रतीक्षाचा विवाह आत्याचा मुलगा जयसिंग कदम याच्याशी थाटामाटात लावून देण्यात आला.
छळाची सुरुवात:
लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी सोन्याच्या अंगठीची मागणी सुरू केली. २०२४ मध्ये प्रतीक्षाला मुलगी झाली, तेव्हाही सासरच्यांनी नाराजी व्यक्त केली आणि बाळंतपणाचा खर्च देण्यास नकार दिला. पती जयसिंग हा वारंवार दारू पिऊन येऊन तिला मारहाण करत असे.
कारचे हप्ते आणि छळ:
जानेवारी २०२६ मध्ये जयसिंगने एक कार खरेदी केली. या कारचे हप्ते भरण्यासाठी प्रतीक्षाने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ वाढला. १६ एप्रिल रोजी तिने गावी यात्रेला येण्याची इच्छा व्यक्त केली असता, पतीने तिला फोनवरच धमकावले. १७ एप्रिल रोजी फोन सुरू असतानाच जयसिंगने तिला वडिलांसमोर मारहाण केली, ज्याचा आवाज फोनवरून वडिलांना ऐकू आला. त्यानंतर काही वेळातच प्रतीक्षाने राहत्या घरी गळफास घेतला.
पोलीस कारवाई:
प्रतीक्षाला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतीक्षाचे वडील बन्सी खामकर यांच्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांनी पती जयसिंग मधुकर कदम आणि सासू हौसाबाई मधुकर कदम यांच्याविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



