Pune : पुण्यात खळबळ! प्राचार्याच्या छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप

Pune : शिक्षण क्षेत्राला हादरवणारी घटना पुण्यात घडली आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) येथे पीएचडी करत असलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ एप्रिल रोजी शाहूनगर येथील राहत्या घरी घडली. विद्यार्थिनी बॉटनी विषयात संशोधन करत होती. आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोट लिहिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या चिठ्ठीत तिने कॉलेजचे प्राचार्य तथा सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन यांच्याकडून ऑगस्ट २०२५ पासून गैरवर्तन, मानसिक छळ आणि अनैतिक वर्तन होत असल्याचा आरोप केला आहे. या सततच्या त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने नमूद केले आहे.

दरम्यान, घटनेच्या काही दिवस आधी आरोपीने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असे वर्तन करणार नाही, अशी लेखी हमी दिल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र त्यानंतरही विद्यार्थिनी मानसिक तणावातून बाहेर येऊ शकली नाही.

या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *