Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना! आंबेडकर जयंतीनिमित्त 13-14 एप्रिलला शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 13 ते 14 एप्रिल दरम्यान शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल आणि निर्बंध लागू केले आहेत. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे 13 एप्रिलपासूनच गर्दी वाढण्यास सुरुवात होते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक नियोजन केले आहे. हे निर्बंध 13 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजल्यापासून लागू होऊन 14 एप्रिल मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कायम राहतील.

कोणत्या मार्गांवर वाहतूक बदल?

  • एसके बोले रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगीज चर्च) येथे एका बाजूची वाहतूक बंद
  • एसव्हीएस रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन) सर्व वाहनांसाठी बंद
  • रानडे रोड पूर्णपणे बंद
  • ज्ञानेश्वर मंदिर रोड (एसव्हीएस रोड जंक्शन ते दादर चौपाटी) वाहतुकीसाठी बंद

स्थानिक रहिवाशांसाठी रस्ता क्रमांक 5 मार्गे प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अवजड वाहनांवर निर्बंध

चैत्यभूमी परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी टेम्पो व इतर अवजड मालवाहतूक वाहने वळवण्यात येणार आहेत. बेस्ट बस वगळता अवजड वाहने माहीम जंक्शनवरून एलजे रोडमार्गे वळवली जातील.

पार्किंग व्यवस्था

वाहनचालकांसाठी खालील ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल:

  • सेनापती बापट मार्ग (माहीम व दादरहून येणारी वाहने)
  • इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल, एल्फिन्स्टन
  • कोहिनूर स्क्वेअर पीपीएल, कोहिनूर मिल कंपाऊंड, शिवाजी पार्क
  • कामगार स्टेडियम, सेनापती बापट मार्ग
  • इंडिया बुल्स सेंटर पीपीएल, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्टन
  • फाइव्ह गार्डन्स परिसर

मुंबई पोलिसांनी नागरिकांना या कालावधीत सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *